गावातील राजकारणी लोकांनी समाजकारणी, उद्योगपती वगैरे मंडळीनी थोडा पुढाकार घेतला तर सगळी परिस्थिती आवाक्यात येईल. सध्या रोटरी ने जसे क्रिडासंकूल बद्दल पुढाकार घेतला आहे तसाच पुढाकार कोरोना संदर्भात घ्यायला,कारण कोरोणा ची दाहकता मी व माझ्या कुटुंबाने अनुभवली आहे.त्यामुळे सर्वांनी रुग्ण व त्याच्या नातेवईकांना मदत करावी ,रुगांचे जीव वाचवण्यासाठी याचा उपयोग होईल,असे आवाहन ॲड.शकुंतला फाटक सावळे यांनी केले आहे.
"कोरोणा ची दाहकता " सर्वजणच अनुभवत आहेत,दरवेळी कळंबकर म्हणून आपलं गांव एकञ येतं व यशस्वी ही होतं, याच गावाने अनेक गावांना संकट काळी मदत केली आहे. आता आपल्याच साठी एकशे पन्नास बेड चे हॉस्पिटलची सोय केली तर पुरेसे होणार आहे. एखादे शहरातील मंगल कार्यालय ,एखादा हॉल ताब्यात घेऊन त्यांत करावे. त्या एकशे पन्नास बेड मध्ये कोविड सेंटर सुरू करून एक ते सात एच.आर. सी. टी. स्कोर वाले ऍडमिट करता येतील.
कळंब मध्ये चांगले डॉ आहेत त्यांनी सर्वांनी योगदान द्यावे. सगळ्या नगरसेवकांनी , लोकप्रतनिधीं नी पुढाकार घेऊन डॉक्टर ना भेटायचं ,व सर्वांना सकाळी दुपारी आणि रात्री एक एक राऊंड घ्यायला लावायचा . प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन डॉकटर आणि तिथला स्टाफचा वापर ही आपल्याला करता येवू शकतो . हे काम विसरणार नाहीत. तसेच या महामारीत केलेली रूग्ण सेवा ही इश्वर सेवेपेक्षा कमी नाही.
अशा प्रकारे खाजगी कोव्हीड सेंटर सुरू करावे,असे आवाहन ॲड.शकुंतला फाटक..सावळे यांनी केले आहे.
लोक सरकारी दवाखान्यात जायला घाबरणार नाहीत, तसेच बार्शी व सोलापूर वगैरे ठिकाणी रूग्ण नेईपर्यंत आपल्या इथेच त्याचा जिव वाचेल, जे रुग्ण बाधित आहेत,त्यांना आधार द्या,त्यांच्या नातेवाईकांना ही जमेल तशी मदत करा.
0 Comments