तेरणेचा छावा/धाराशिव : शहरातील रामनगर येथे मावळा प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार (दि.13 मे) रोजी करण्यात आले होते.
समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत जवळपास १७० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांना महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशाच विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रतिष्ठानला शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांचा यथोचित सन्मान केला व सर्वांचे आभार मानले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासमवेत मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अक्षय खळदकर, अध्यक्ष आकाश इंगळे, उपाध्यक्ष ऋषिकेश राऊत, सचिव आदित्य धावारे, मिरवणूक प्रमुख ओम सरवदे, उदयराज जाधव, राहुल शिंगे, दादा मोहिते, पृथ्वीराज जाधव, रोहित पवार, बालाजी पेठे, रोहण घाडगे, श्रीराम वडने, सूरज मेंढे, अभिषेक पवार, अभय खळदकर, निनाद जगताप, मयूर पवार आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments