Subscribe Us

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दिलीत वस्ती योजने अंतर्गत प्रस्तावांच्या शासकीय मान्यतेसाठी बैठक.


तेरणेचा छावा/धाराशिव:-
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे पार पडली.
    बैठकीस धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. ढेंगळे पाटील, तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
     यावेळी विविध विकासकामांच्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे यावर विशेष भर देण्यात आला.
    तसेच, प्रस्तावांची अंमलबजावणी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. सर्व विभागांनी समन्वय साधून ही योजना प्रभावीपणे राबवावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

Post a Comment

0 Comments