Subscribe Us

आंदोरा गावात सद्या होत असलेल्या आलेल्या विकास कामावर आक्षेप घेत केली तक्रार.


   
 तेरणेचा छावा/​कळंब:- 
कळंब तालुक्यातील आंदोरा येथे सद्या'दलितवस्ती सुधार योजने'अंतर्गत सुरू असलेल्या कामा बरोबरच मागील 3 वर्षापासून झालेल्या विकास कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा खळबळजनक दावा ग्रामस्थांनी केलेला आहे.या संदर्भात ग्रामस्थ पी. जी. नाना तांबारे यांनी कळंब पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
​     ​आंदोरा गावात शासन स्तरावरून मंजूर झालेल्या दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सद्या अंडरग्राऊंड नाली बरोबरच इतर ही विकासकामे सुरू आहेत.मात्र ही कामे तांत्रिक निकष पाळून बांधकाम खात्याच्या अंदाजपत्रकानुसार केली जात नसल्याचा आरोप करत
कामात वापरले जाणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असून सदर कामी वापरले जाणारे चेंबर तर फारच निकृष्ट व तकलादू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पुढे प्रत्यक्ष काम करत असताना नाली खोदाई नंतर आरसीसी पाईपलाईन टाकण्या अगोदर मोठ्या खडीने सोलिंग केल्यावर उतार व्यवस्थित काढण्या करीता करण्यात येणारी पीसीसी ४ इंच जाडी ऐवजी प्रत्यक्षात १.५ ते २ इंच केली आहे त्या करीता नियमानुसार मिक्सर मशिनचा वापर केलेला नाही.
पीसीसी लेवल मध्ये न केल्यामुळे RCC पाईपलाईनचा उतार निट निघत नाही म्हणून पाईपखाली दगड,फरशीच्या तुकड्यांचा सर्रास वापर करून पाईपच्या कडेने मुरूम भरण्या येवजी कुठे खोदाईत निघालेले खराब मटेरिअल तर कुठे दगड व अल्पप्रमाणात मुरूम वापरून त्यावर अपेक्षित जाडीचे एम २० कॉंक्रीट मिक्सर मशिनने माल न बनवता हातपलटीने माल बनवून काम करण्यात येत आहे यापूर्वीही अशीच कामे झाले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
    हे करत असताना बऱ्याच ठिकाणी चेंबर व कॉंक्रीटचा वरील भाग लेवल मध्ये नाही.महत्वाच म्हणजे गावात सर्वत्र केलेले काम हे रस्त्याच्या वरच आहे.प्रत्यक्ष हे काम सुरू होते तेंव्हा अनेक नागरीकांनी आमच्या घराच्या पृष्ठभागा पेक्षा RCC पाईपलाईन व चेंबरचे काम वर होत आहे त्यामुळे आमच्या घरात पावसाळ्याच पाणी जाते तसेच रस्त्यावर ही पाणी साचून राहते तेंव्हा हे असे चुकीचे काम करू नका म्हटले तर हे काम असेच असते जेव्हा रस्ता करण्यात येईल तेंव्हा रस्त्याची व आत्ताच्या कामाची लेवल एक करायची आहे अस सांगून सर्रास चुकीची काम केलेली आहेत.
गावात सत्ता कोणाची ही असो प्रत्येक वेळी नव्याने रस्ते करताना आहे त्याच रत्यावर नव्याने मटेरिअल टाकून रस्ते बनवले जातात त्यामुळे अनेकांची घर ही रस्त्यापेक्षा बरीच खाली गेलेली आहेत.
तेंव्हा यापुढे रस्ते करताना गेल्या तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यांनी   बंद पाडलेली जलजीवन मिशन अंतर्गत होणारी पाण्याची पाईपलाईन टाकून तसेच सर्व रस्त्यांच्या कडेला तुंबलेल्या नाल्या काढून त्या ठिकाणी अंडरग्राऊंड RCC पाईपलाईन व चेंबर करून खराब झालेले रस्ते खोदून काढून त्यावर नव्याने रस्ते करण्यात यायला पाहिजेत.
नागरीकांच्या विवीध कामांच्या बाबतीत सतत होणाऱ्या मागणीकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठरल्या प्रमाणे व नियमानुसार ग्रामसभा घेऊन नागरिकांच्या समस्या समजून घेऊन विकास आराखडा बनवत नाही नसल्याचेही म्हटले आहे.
गावात व गावाच्या कडेने घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे रोगराई वाढलेली आहे.कचरा संकलन करायचे साहित्य व घंटागाडी वापरावीना ग्रामपंचायत कार्यालयात पडून आहे.
विकासकामं करत असताना नागरिकांच्या माहिती करीता कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावणे जरूरी असताना ते लावले जात नाहीत.
सद्या सुरू असलेली विकास कामं ही मार्च अखेरला बिल काढायच्या उद्देश्याने उरकण्यात येत आहेत या व अशा निकृष्ठ विकासकामंनमुळे बांधकामाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.
    ​"गावाच्या विकासासाठी आलेला निधी योग्य पद्धतीने वापरला जावा.मागी 3 वर्षांन पासून करण्यात आलेल्या कामांच्या चौकशी बरोबरच सध्या सुरू असलेल्या नालीच्या कामाचे बिल काढण्यापूर्वी त्याची सविस्तर चौकशी व्हावी आणि एस्टिमेटनुसार पुन्हा काम करून घ्यावे," अशी मागणी तक्रारदार पी. जी. नाना तांबारे यांनी केली आहे. त्यांच्याकडे या कामातील अनियमिततेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून उपलब्ध असल्याचेही त्यांनी अर्जात नमूद केलेले आहे.
​   या प्रकरणावर पंचायत समिती प्रशासन काय कारवाई करते की नुसता चौकशीचा फार्स करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments