Subscribe Us

शिवसेना जि.प.गटनेते पदी विकी चव्हाण यांची निवड


धाराशिव/तेरणेचा छावा:-
धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना पक्षाच्या गटनेते पदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड झाली आहे. कालच शिवसेनेच्या सर्व 15 सदस्यांच्या सहीचे पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  सुपूर्त करण्यात आले होते व सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे .आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड करण्यात आली असुन अध्यक्ष पद निवडीच्यावेळी सावंत यांचे पारडे जड झाले आहे. 
    शिवसेना पक्षाचा व्हीप जारी करण्याचे व ध्येय धोरणे राबविण्याचे काम विकी चव्हाण हे सभागृहात करणार आहेत.निवडी वेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.
    पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट नुकतीच झाली यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते, शिवसेनेचे एकसंध व एकजुटीने असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments