Subscribe Us

300 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून साजरा केला आ. तानाजी सावंतांचा वाढदिवस.


तेरणेचा छावा/धाराशिव:-
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री, शिवजल क्रांतीचे प्रणेते भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रा.डॉ. तानाजीराव सावंत  यांच्या वाढदिवसानिमित्त तेरखेडा येथे उत्साहाचे आणि सेवेचे वातावरण पाहायला मिळाले.वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व जपत पैलवान ग्रुप आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद शिवसेनेचे गटनेते  विक्की (दादा) चव्हाण यांच्या वतीने भव्य 'रक्तदान शिबिराचे' अत्यंत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
    या शिबिरातून 'आरोग्य सेवा' या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने बळ मिळाले. विशेष म्हणजे, या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला कृतज्ञतापूर्वक 'पाण्याचा जार' मोफत देऊन एक आगळावेगळा संदेश देण्यात आला. ३०० हून अधिक सुजाण नागरिकांनी रक्तदान करून प्रा.डॉ.आ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाला सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले. भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन  केशव सावंत  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. 
     नगर पंचायत गटनेते नागनाथ बापू नाईकवाडी,सुनील उंदरे, प्रवीण गायकवाड, सतीश आबा शेरकर, नितीन रणदिवे, बाळासाहेब मांगले, उद्धव साळवी, दत्तात्रय तोडकर,अक्षय चव्हाण, सुनील बाप्पा जाधवर, मुन्ना मनगिरे, बबन कात्रे, बालाजी हलगरे, कृष्णा कदम, राहुल आडमुठे,यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने हा सोहळा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला. शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तदान झाल्यामुळे या शिबिराची चर्चा मात्र तेरखेडा व परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू होती.

Post a Comment

0 Comments