तेरणेचा छावा/कळंब:-
येरमाळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उच्चशिक्षित व अनुभवी उमेदवार दिल्यामुळे परिसरातील जनमानसातून काँग्रेसची सुप्त लाट असल्याची कुजबुज ऐकावयास येऊ लागली आहे.
काँग्रेस पक्षाकडून छायाताई दिलीप वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी 2012 ते 2016 पर्यंत कळंब पंचायत समितीचे सभापती पद भूषवलेले असून त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या एमएबीएड उच्चशिक्षित असल्यामुळे जिल्हा परिषद सभागृहात परिसरातील अडीअडचणी त्या सक्षमपणे मांडू शकतील असा लोकांचा कायास आहे. त्यामुळे आजच्या घडीला तर मतदार संघात त्यांच्या नावाची सुप्त लाट असल्याची कुजबुज एकावयात येऊ लागली आहे.
0 Comments