तेरणेचा छावा/दहिफळ:-
मोहा जिल्हा परिषद नागरिकांचा मागासवर्ग स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित आहे.उमेदवारी अर्ज दाखल करून पडताळणी झाल्यानंतर दहा उमेदवारी अर्ज वैद्य ठरले आहेत. शिवसेनेकडून सीमा राजू झोरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रूपाली बालाजी नागटिळक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून मोमीन जावेदाबी सलीम तर अपक्ष मडके सुजाता गौतम, दिघे अनुराधा राहुल, नागटिळक पूजा श्याम,नागटिळक विमल पोपट, माने नंदूबाई हनुमंत, सुडके शुभांगी किरण कुमार, सोनार पार्वती शुभम यांची उमेदवारी वैद्य ठरली आहे
गौर पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टी कडून तात्यासाहेब देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून श्याम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार ) पक्षाकडून तुषार वाघमारे, तर अपक्ष बाबुराव तवले, धनाजी देशमुख, सारिका मारुती देशमुख, चरणेश्वर पाटील,पोपट पाटील, बालाजी भातलवंडे,प्रशांत भातलवंडे, बालाजी मते,भगवान मते,धनंजय वाघमारे ,विवेक भातलवंडे,विजयश्री वाघमारे,बाळासाहेब शिनगारे, या 16 उमेदवाराचे अर्ज वैद्य ठरले आहे.
मोहा पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनुराधा दिघे, शिवसेनेकडून रत्नमाला दिघे, तर अपक्ष पूजा नागटिळक, रूपाली नागटिळक,सुषमा माळी ,सुषमा शेळके, दिगंबर मोकाशी शामल या सात उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले आहेत.
अशाप्रकारे मोहा जिल्हा परिषद गटात 10,गौर पंचायत समिती गणात 16 तर मोहा पंचायत समिती गणात 7 उमेदवारी अर्ज वैद्य ठरले आहेत. परंतु अनेक हौशी उमेदवारांनी आपल्या उमेदवारीची तहान मात्र सोशल मीडियातूनच भागवून घेतली असल्याचे यावरून दिसून येत आहे.
0 Comments