तेरणेचा छावा/धाराशिव:-
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या या संपर्क कार्यालयातून दि. २९ व ३० मे रोजी लोकनेते स्व. अजितदादा पवार साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजन व समन्वयाचे कामकाज पार पडणार आहे.,सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.नंदकुमार राऊत हे संमेलनाध्यक्ष पद भूषविणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत,
मराठी साहित्य, संस्कृती आणि विचारांचा भव्य सोहळा ठरणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी धाराशिव सज्ज होत असून, साहित्यप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. साहित्य, समाज आणि संस्कृती यांचा सेतू मजबूत करणाऱ्या या संमेलनाच्या माध्यमातून नवोदित लेखक, कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे..
धाराशिवची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील साहित्यिकांना मोठे व्यासपीठ मिळवून देतानाच मराठी साहित्य चळवळीला नवी ऊर्जा देण्याचे काम या संमेलनातून करण्यात येणार आहे..
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे, प्राचार्य संदीप देशमुख, अ. भा. मराठी साहित्य परिषदेचे संयोजक परमेश्वर पालकर, साहित्य संमेलनाचे संयोजक राजा जगताप, श्रीमती नीना महामुनी, श्रीमती गुंजाळ मॅडम, दिलीप कांबळे, नगरसेवक नाना घाटगे, माजी नगरसेवक राणा बनसोडे, महेश पोतदार, दौलत निपाणीकर, सोपान पवार, जगदीश पाटील, अभिजीत देशमुख, राकेश सूर्यवंशी, अभिजीत कदम, लखन देशमुख, अजित बाकले, सावन देवगिरे, पवन स्वामी, सुयश गरड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments