Subscribe Us

असून वळींबा नसून खोळांबा. ग्रामपंचायत करतीय अरेरावीची भाषा,ग्रामस्थांचा आरोप.


तेरणेचा छावा/दहिफळ:-
लाखो रुपये खर्च करून दहिफळ ता. कळंब येथील ग्रामपंचायत कार्यालयाने आरो फिल्टर थंड पाण्याची सोय केलेली आहे परंतु    मागील 2 ते 3 महिन्यापासून वारंवार तोंडी सांगून व विनंती करून ग्रामपंचायत कार्यालय दहिफळ यांनी RO फिल्टर चे पाणी थंड केले नाही. उन्हाळ्याचे दिवस असून तापमान 40°c च्या पुढे सरकलेले असल्यामुळे ग्रामस्थांना थंड पाणी पिण्यासाठी अतिआवश्यक आहे. HO फिल्टरची लाखो रुपयाची योजना दुरुस्ती अभावी बंद आहे. ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्तीसाठी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. तरी उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी  लवकरात लवकर लक्ष घालून HO फिल्टरचे पाणी थंड करण्यासाठी योग्य ते लक्ष घालून RO फिल्टर ची दुरुस्ती करावी, व लवकरात लवकर ग्रामस्तांसाठी थंड पाण्याची सोय .
करण्यात यावी अन्यथा १० मे २०२६ रोजी समस्त ग्रामस्थ दहिफळ ग्रामपंचायत कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करतील याची देखील गांभीर्याने नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भातलवंडे यांनी ग्रामपंचायत कार्यालय दहिफळ, गटविकास अधिकारी कळंब, तहसील कार्यालय कळंब, मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्याकडे देण्यात आले आहे.या निवेदनावर 110 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य प्रशांत भातलवंडे,शिवसेनेचे सुरेश मते,राहुल कुटे,संजय भातलवंडे उपस्थित होते.आता तरी ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देऊन ग्रामस्थांना थंड पाण्याची सोय करते की नाही हे पहाणे गरजेचे आहे.
    याविषयी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे विचारणा केली असता ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी अरेरावेची व उद्धट भाषा वापरून नागरिकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याची चर्चा ग्रामस्थातून ऐकावयास येत आहे.

Post a Comment

0 Comments