Subscribe Us

आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप


तेरणेचा छावा/येरमाळा:-
    धाराशिव - कळंब तालुक्याचे आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजीवरील अवास्तव खर्चाला फाटा देत एक स्तुत्य शालोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समाधान बाराते व भगवान ओव्हाळ यांच्या पुढाकारातून बुधवार दि. २५ रोजी मलकापूर व संजीतपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची ही अभिनव संकल्पना पालक व ग्रामस्थांनीही कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल पाटील,रामहारी मुंढे, समाधान बारकुल,लहु बारकुल, बालाजी बारकुल, बापू जमदाडे, सुहास बारकुल, सचीन कोकाटे, मारूती बारकुल, उमेश भालेराव, किरण लोमटे, सुधीर पायाळे, नरसिंग लोमटे,विलास कुटे,चितांबर पुरेकर,रामलिंग बाराते,राहुल बाराते,शहाजी हवालदार,बापू मगर, दशरथ मगर विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापक भंडारे , शाम ओव्हाळ,यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुंदर लोमटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर लोमटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments