Subscribe Us

जनहित पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान


तेरणेचा छावा/येरमाळा:-
 येथील जनहित पतसंस्था गेल्या 22 वर्षापासुन येरमाळा व पंचक्रोशीमध्ये बॅकींक क्षेत्रात कार्यरत आहे, मागील 22 वर्षात संस्था प्रत्येक वर्षात नफ्यात आहे संस्थेचा ऑडीट वर्ग अ असून संस्थेला सलग ५ व्या वेळस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई यांच्या कडून दिला जाणारा अतिशय मानाचा दिपस्तभ पुरस्कार मंगळवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पुणे येथील आर्यन रिव्हरवूड रिसॉर्ट भोर येथे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयजी जोशी फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब कोयटे ,डॉ वासुदेव काळे, सीईसो सुरेखाताई लावंडे यांच्या शुभहस्ते संस्थंचे संस्थापक प्रा.संतोष तौर, छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार डॉ शिवानंद बीडवे, वल्लभ माशाळकर  दत्तात्रय रणसिंग, नितीन कवडे यांनी स्विकारला.
     १० कोटी ते ५० कोटी या गटातून छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे,   याबद्दल संस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी सर्व संचालक सभासद खातेदार ठेवीदार व कर्मचारी गावकरी यांच्या विश्वासावर हा पुरस्कार मिळाला असल्याने सर्वांचे अभिनंदन केले आहे.
    जनहित पतसंस्थेला गेल्या पाच वर्षापासून सलग हा मानाचा पुरस्कार पटकावण्याचा मान फक्त या संस्थेलाच मिळालेला आहे. ही संस्था येरमाळा व परिसरातील तळागाळातील गरजू व्यावसायिकांना खऱ्या गरजवंतांना मदत करत असल्यामुळे या संस्थेचा नावलौकिक वरचेवर वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशा या संस्थेच्या कार्यामुळेच संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

Post a Comment

0 Comments