Subscribe Us

जिल्ह्यात घडणार मोठ्या घडामोडी, टांगा पलटी घोडे फरार.ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचीही राजकीय प्रगल्भता वाढली.


 
                                                            संग्रहचित्र
तेरणेचा छावा/धाराशिव:-
धाराशिव जिल्ह्यात येत्या एक-दोन दिवसात अनेक राजकीय उलथापालथ होणार असून मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 
    जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांची फॉर्म दाखल करण्याची तारीख 21 जानेवारीपर्यंत असून धाराशिव जिल्ह्यात या एक-दोन दिवसात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडून टांगा पलटी घोडे फरार अशी अवस्था पहावयास मिळणार आहे. 
  जिल्हा परिषद ,पंचायत समिती ग्रामपंचायत,नगरपरिषद या निवडणुका राजकीय कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांत राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या तिकिटासाठी मोठी रस्सीखेच  पाहायला मिळत असते.
     राजकीय नेते मंडळी आपल्या सोयीनुसार राजकारण करत असल्याचे आपल्या जवळच्या नातेवाईकाला बिनविरोध अथवा सोयीच्या ठिकाणी तिकीट देऊन निवडून आणण्यावर जास्त भर  मागील अनेक निवडणुकातून पहावयास मिळालेले आहे. तशी जिल्ह्यात शेकडो उदाहरणे पहावयास मिळालेली आहेत त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याचा अनेक ठिकाणी राजकीय बळी गेलेला आहे. अशामुळे कार्यकर्ते ही आता राजकीय नेते मंडळी प्रमाणे आपल्या राजकीय करिअरकडे पाहून निर्णय घेऊ लागली आहे. नेते मंडळींनी तडजोड केलेली चालते मग आम्हीच केली तर काय होते अशाही चर्चा ऐकावयाची येऊ लागले आहेत.मोठ्यान केले  की प्रेम आणि गरिबांन केलं म्हणजे लफडं का? अशी दुटप्पी भूमिका आता चालणार नाही अशी कार्यकर्त्यातून भावना ऐकावयास येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एक दोन दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या तर नवल वाटायला नको अशाप्रकारे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यालाही आता राजकीय प्रगल्भता येऊ लागल्यामुळे नेतेमंडळीची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. इतके दिवस आम्ही तुमचं बघितलं आता आमच आम्हाला बघू द्या अशी ही दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास मिळत आहे. राजकीय व्यक्तींनी उभा केलेल्या नातेवाईकाच्या विरोधात विरोधी पक्षातील नेतेमंडळीच्या नातेवाईकांनीच उभा राहावे राजकीय तडजोड करून उगाच आव आणून गोरगरीब कार्यकर्त्यांची माती करू नये अशीही चर्चा जिल्हावाशियातून ऐकावयास येऊ लागली आहे.ये पब्लिक है सब जानती है.त्यामुळे येणाऱ्या एक दोन दिवसात जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Post a Comment

0 Comments