Subscribe Us

डोंगर पोखरून उंदीर काढला! येरमाळा पोलीस स्टेशनची बेधडक कारवाई!!


येरमाळा/तेरणेचा छावा
    येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रोजी दुपारी 01:30 वा. सु. येरमाळा पो.ठा. हद्दीत येडेश्वरी मंदीर परीसरात भेले प्रसाद दुकानाचे समोर छापा टाकला  असता.  आरोपी नामे -1) रमेश मत्या काळे, वय 50 वर्षे, रा. पारधी पिडी तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद, हे येडेश्वरी मंदीर परीसरात भेले प्रसाद दुकानाचे समोर सुरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 360 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. वास्तविक पाहता या परिसरात किती सुरटचे  टेबल लागले जातात   व यातून लाखो रुपयांची उलाढाल  असल्याचे नागरिकांतून एकावयास येत असतानाही फक्त येरमाळा पोलिसांनी 360 रुपये जप्त केल्यामुळे लोकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे? परंतु लोकात ही चर्चा आहे की  कारवाई म्हणजे फक्त दिखाऊपणा असल्याची चर्चा नागरिकांतून एकावयास येत आहे! पब्लिक सब जानती है असाच सूर नागरिकांतून एकावयास येत आहे! 
त्यामुळे येरमाळा पोलिसांनी डोंगर पोखरून उंदीर  काढल्याची चर्चा नागरिकांतून चवीने चर्चिली जात आहे.

Post a Comment

0 Comments