येरमाळा/ तेरणेचा छावा : - येरमाळा येथील कुमारी सृष्टी संतोष जमदाडे हिने 3 जानेवारी रोजी झालेल्या लातूर विभागीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील 61 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. व पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या निमित्ताने येरमाळा येथील मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते सृष्टी जमदाडे हिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विलास थोरबोले, रत्नपुरचे सरपंच सुनिल वाघमारे, फौजी रमेश जाधवर, तानाजीराव टेकाळे, शहाजीराव टेकाळे, सुधीर लोमटे, राजाभाऊ निचळे, संतोष जमदाडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
0 Comments