उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
घर चलो अभियान या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माननीय श्री.खा.शरदचंद्रजी पवार यांच्या संकल्पनेतून व माननीय श्री.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्यकर्ते यांच्या घरी, ग्रामपंचायत वॉर्डांमध्ये, कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन, स्वतः कार्यकर्त्यांच्या वार्डातील, त्यांच्या गावातील, अडीअडचणींचा मागोवा घेणे यांच्याशी दिलखुलास चर्चा करणे पक्षाचे विचार तळागाळातल्या माणसांमध्ये पोहोचवणे तसेच कार्यक्रमाची रूपरेखा ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उस्मानाबाद कार्याध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय (दादा) पाटील दुधगावकर यांनी शनिवार दिनांक 4 जून रोजी गौर ता. कळंब येथे तरुणांना मार्गदर्शन केले .
यावेळी कळंब तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष रमेश देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.ग्रा.पं.सदस्य श्री.जनार्धन लंगडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम गौर येथे घेण्यात आला या कार्यक्रमास गौर गावातील अनेक तरुण तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तरुण नेते उपस्थित होते यावेळी वाघोली गावचे राष्ट्रवादीचे नेते श्री.औदुंबर धोंगडे तसेच भोसा या गावाहुन आलेले माजी उपसरपंच जाकीरभाई पटेल .जिक्राईल पटेल वाहेद पटेल , रशीद पटेल, अख्तार पटेल इ. उपस्थिती होती तसेच गौर गावातील ग्रा.पं सदस्य नामादेव गाढवे सर, अमोल देशमुख अमोल लंगडे, विजय (नाना) लंगडे, जयसुनकुमार (किट्टु) लंगडे, अजित (नाना) माळी, दिपक माळी, गोविंद शेळके, अजय केसरे, सुनिल पवार, यांची उपस्थिती होती कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांसाठी व विशेषतः खेडेगावासाठी केलेल्या उपायोजना व विकास कामे याबाबत सविस्तर चर्चा मार्गदर्शन दुधगावकर दादा यांनी तरुणांना केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड.सुशिलकुमार लंगडे यांनी केले.".
0 Comments