उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
कळंब- छञपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रतिमेला थुंकी व जोडोमारो आंदोलन छञपती शिवाजी महाराज पुतळा समोर करण्यात आले.तसेच राज्यपाल भगतसिंह कोशारी व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेऊन महापुरुषांचा अवमान करुन सामाजिक भावना दुखावल्या गेल्या त्यांचा वर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब मार्फत राष्ट्रपतीना देण्यात आले आहे
या वेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुल भैय्या गायकवाड जिल्हा अध्यक्ष अॅड तानाजी चौधरी संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ कवडे टिपू सुलतान ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अकिब पटेल तालुका अध्यक्ष बालाजी नाईकनवरे, शिवाजी माने, जगदीश गवळी, प्रशांत गायकवाड शिवशाहीर बंडूभाऊ खराडे, छञपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड कळंब तालुका अध्यक्ष इम्रान मिर्झा दत्ताञय वाघमारे विकास गडकर, मनोज पाटील, आमोल गायकवाड उपस्थित होते
0 Comments