तेरणेचा छावा/धाराशिव:-
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये महत्त्वपूर्ण हालचाली घडल्या आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या विजयी सदस्यांनी मुंबई येथे एकत्र बैठक घेऊन जिल्ह्यात एकदिलाने राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याची माहिती सूत्राकडून समोर आली आहे.
या बैठकीमुळे जिल्हा परिषदेत महायुतीचे बहुमत अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. परिणामी, जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा उमेदवार विराजमान होण्याची शक्यता बळकट झाली आहे तर उपाध्यक्ष पद उमरग्याकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.
या बैठकीस आ.राणाजगजितसिंह पाटील ,राजन साळवी शिवसेना संपर्कप्रमुख धाराशिव ,रवींद्र गायकवाड माजी खासदार तसेच ज्ञानराज चौगुले माजी आमदार उपस्थित होते.
या घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यात महायुतीची एकजूट अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. फक्त या घडामोडीत भूम परंडा वाशी शिवसेनेचे सदस्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेतील आ.तानाजी सावंत यांच्या गटाला वगळून सत्ता स्थापन होण्याच्या हालचाली वाढताना दिसून येत असल्याचे पहावयास मिळत आहे. असे असले तरी भाजपाने आधीच राष्ट्रवादी आणि अपक्ष यांना सोबत घेतल्याने बहुमताचा आकडा पार झालेला आहे. त्यामुळे सत्ता समीकरणात शेवटच्या क्षणात काहीही घडू शकत
0 Comments