*प्रवाही:- भूमिपुत्र वाघ*
मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झालं. निधनानंतर आपसूकच यशवंतला शिकाळं धरावं लागणार होतं.कारण फुले दांपत्य यांनी यशवंतराव यांना दत्त घेतलं होतं.हा यशवंत कोण होता?विधवा ब्राह्मण स्त्रीच्या पोटी आलेला सुपुत्र होता.त्या बाळाला लहानपणीच सावित्रीमाता फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलं होतं. यशवंता मोठा झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरेट मिळविली. जेंव्हा महात्मा फुले यांचे देहावसन झालं.तेंव्हा अंत्यविधीची तयारी झाली. आता शिकाळं धरायचा अधिकार यशवंताचाच होता.यात कुठलही दुमत नव्हतं.मग समाजातल्या लोकांनी यशवंतला पुढे केलं.साहजिक होतं भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांच्याच हातात शिकाळं दिल जातं. यशवंता पुढे झाला.तेंव्हा तिथल्या धर्ममार्तंडानी यशवंतला रोखलं.तुला शिकाळं धरता येनार नाही. तू ब्राह्मण आहेस.महात्मा ज्योतिराव फुले हे शूद्र आहेत.त्यामुळे शूद्राला पाणी पाजण्याचा धर्म व्यवस्थेने तुला अधिकार दिलेला नाही.म्हणून त्याला शिकाळं धरण्यापासून रोखण्यात आलं. तेच बाका होता. अस्वस्थ करणारी घटना होती.धर्म मार्तंडाची ताकदही जास्त होती.नेमकं काय करावं? सावित्रीला सुचत नव्हतं.थोडी स्तब्ध झाली.आणि काही क्षणातच.स्वतः शिकाळं धरून महात्मा ज्योतिबांना पाणी पाजण्याचा निर्णय घेतला.समाजातल्या लोकांना सांगितलं तयारी करा. मी सकाळ धरते. आणि शिकायला धरलं. समाज आवाक झाला. जणू भूकंप होऊन पृथ्वी हादरेल अशी अविर्भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उमटले होते. यावेळी धर्म मार्तंड हातबल झाले होते. अपमानित होऊन ते निघून गेले. हा इतिहास पुसला जात नाही.सावित्रीने पहिल्यांदा पुरुषप्रधान संस्कृतीचं पाळमुळं घडवून फेकलं.मग पती महात्मा ज्योतिराव फुले यांना पाणी पाजण्यासाठी शिकाळं धरलं. कैक हजार वर्षाच्या इतिहास मधील पहिली घटना होती ती. असामान्य घटना. पुरुषप्रधान संस्कृतीला चपकार बसवणारी घटना. परिवर्तनाची लाट निर्माण करणारी घटना. इथल्या धर्म मार्तंडानी बहिष्कृत केलेल्या स्त्रीला, स्त्रियांचे अधिकार मिळाल्याची जाणीव करून देणारी घटना. पुरुषांना जेवढे अधिकार असतात, तेवढेच अधिकार स्त्रियांना सुद्धा असतात याची जाणीव करून देणारी घटना. समतेच्या विचारा ची चिंगारी पेटवणारी घटना.सावित्रीमातेनं शिकाळं धरलं.आणि महात्मा फुलेंना तीन पाणी पाजलं.
हा इतिहास भुजत नसतो. कर्मवीरांच्या कार्याचा इतिहास कायम जिवंत असतो. म्हणून थोर माणसं कधी मरत नसतात. असं म्हटलं जातं.माणसं येतील आणि जातीलही परंतु त्यांचा विचार आणि त्यांनी केलेले कार्य हे अजरामर राहते.
मला वाटतं माता सावित्रीच्या नंतर मी तरी इतिहासात कुठेही नोंद पाहिली नाही. जिथे मुलगा असून सुद्धा मुलीने शिकाळं धरून आईला पाणी पाजलं.
ही समतेची घटना, महिलांच्या अधिकाऱ्याची घटना,सातेफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी घडली.सरुबाई नंदराज डोके.त्यांची आई दगडूबाई वाघमारे. ह्या भूमिपुत्र वाघ यांच्या आई.कैक वर्ष आईची सेवा करणारी लेक म्हणून जनसामान्यांमध्ये तिची विशेष ओळख होती. काही दिवस आई माझ्याकडे म्हणजे उमरगा या ठिकाणी राहायची. तिला गावची आठवण झाली की मग सातेफळला जायची ती बहिणीकडे राहायची. बहिण तिला खूप चांगलं सांभाळायची.तिच्या मनासारखं खानं पिनं कपडे लत्ते ती सगळं सगळं पूरवायची. आमच्याही कायम समाधानी असल्याचा दिसून यायचं.विशेष म्हणजे हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम असला की नक्कीच तिने गावाकडे जावं रमावं तिच्या मैत्रिणी सगळ्यांना भेटावं. कारण तिचं माहेर आणि सासर हे सातेफळच होत. त्यामुळे तिच्या जगण्यामध्ये एक बाज होता.ती बेडर होती. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचा वारसा लाभलेली ती घरातली कर्ति होती.वीस वर्षे लगातार ग्रामपंचायतीची सदस्य म्हणून ती कार्यरत होती. उमरगा आणि सातेफळ जाणं येण्याचा जणू रिवाजच पडला होता.सामाजिक कार्याचा वसा घेऊन भूमिपुत्र वाघ यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित करत असताना कुठेतरी इतिहासाच्या पानाची पुन्हा उजळणी व्हावी. अशी त्यांची इच्छा होती. दहा-बारा वर्षे बहीण आई आणि भूमिपुत्र वाघ बोलत राहायचे. गप्पा मारता मारता आईला म्हणायचे.अबू!!!तुला कोणी पाणी पाजवं. तेंव्हा तिने माझ्या मोठ्या भावाचं नाव घ्यावं.मग आम्ही चर्चा करत करत बहिणीनेच पाणी पाजावं असं निर्णय घेतला. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 14.10. 2019 रोजी आईचं निधन झालं. उमरगा येथून पार्थिव धाराशिव जिल्ह्या कळंब तालुक्यातील सातेफळ म्हणजे तिच्या जन्म आणि सासर गावी नेण्यात आलं. तेव्हा मी माझी बहीण, पत्नी, मुलगा सोबत होतो. ठरल्याप्रमाणे बहिणीची तयारी होतीच.सर्व अंत्यविधीचे सोपोस्कार सुरू झाले.गावातील लोकांना काहीच माहित नव्हतं.जेव्हा सकाळं धरायची वेळ आली तेव्हा बहिणीला सांगितलं कबू शिकाळं धरा. बहिण उठली आणि शिकाळं धरलं.
गावातले लोक,भावगीतले लोक अचंबित झाले. काहीतरीच काय? असं असतय काय? सगळे चिडीचिप स्तब्द झाले होते. सामाजिक कार्यातलं पावित्र्य पाहून लोकांनी निषेध न करता मूक निषेध करण्याचा निर्णय घेतला, असंच वातावरण तयार झालं होतं.आणि शेवटी माझ्या बहिणींने शिकाळं धरलं.आणि आईला सन्मानपूर्वक पाणी पाजलं. आणि शेवटचा निरोप घेतला.हे जाणून बुजून, विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता.सावित्रीमाता फुले यांचा विचार पुन्हा पेरावा.समाजापर्यंत घेऊन जावा. स्त्री पुरुष समानतेचे हक्क आणि अधिकार मुलींना मिळाले पाहिजेत. धर्मातील अधिकार, असतील,कौटुंबिक अधिकार असतील, प्रॉपर्टीचे अधिकार असतील, राज्यसत्तेतिल अधिकार असतील, न्यायव्यवस्थेचे अधिकार असतील,शिक्षण घेण्याचे अधिकार असतील, माणूस म्हणून जगण्याचे अधिकार असतील हे सर्व तिला मिळाले पाहिजेत म्हणून हे पाऊल माता सावित्री फुले यांच्यानंतर भूमिपुत्र वाघ यांनी आपल्या बहिणीच्या मार्फत पूर्ण केले.
प्रश्न आहे समाजातील बघ्यांच्या, विचार करणाऱ्यांच्या समोर. स्वतःला समाजवादी म्हणून घेणाऱ्या मित्रांनो अशी वेळ आलीच तर आपण बहिणीला शिकाळं धरण्याचा निर्णय घेऊ शकाल काय? तिच्या मनाची तयारी करून घेऊ शकाल काय?पुरुष प्रधानतेतील मानसिकता बदलू शकाल काय? प्रश्न तर अनेक आहेत....
अजूनही स्त्री पुरुष समानतेची लढाई थांबली नाही...... ती लढावीच लागेल.
0 Comments