Subscribe Us

सरोजिनी राऊत समाजकार्यातून पुढे आलेलं नाव


तेरणेचा छावा/धाराशिव:-
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी चालू झालेली असून 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांच्या नावाची चर्चा मात्र जोरात सुरू असल्याचे दिसून येत असून यापैकी डॉ.सौ.सरोजिनी राऊत यांचेही नाव मोठ्या प्रमाणात ऐकावयास येत आहे.
    सरोजनी राऊत या गेल्या तीन वर्षापासून कळंब धाराशिव मतदार संघात लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला येत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीलाच त्यांच्या नावाची मोठी चर्चाही जनमानसातून एकावयास येत होती. नायगाव जि.प. गट सर्वसाधारण साठी असल्याने या गटातून डॉ.सरोजिनी राऊत यांच्या नावाला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
  त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. गाव तिथे पाण्याची टाकी हा उपक्रम सुरू आहे,नववर्षानिमित्त1000 दिनदर्शिकेचे वाटप केलेले असून गाव तिथे100 झाडे या उपक्रमांतर्गत नायगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये 3000 वृक्षांचे वाटप,छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त स्टिकर व पोस्टरच्या माध्यमातून 3000 घरी शिवसंदेश  पोहोचविण्याचे कार्य, दहावी 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यी,शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा, शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून परिसरातील युवकांना 1800टी-शर्ट वाटप ,लाडकी बहीण योजना व इतर शासकीय योजनेअंतर्गत 1000 महिलांचे फॉर्म भरून सहकार्य, नायगाव गटामध्ये ग्रामविकास पर्यटन, विकास ,सांस्कृतिक विकास ,तीर्थक्षेत्र विकास ,पायाभूत सुविधा, विविध गावांमध्ये बस थांबा, अल्पसंख्यांक विकास ,मुख्यमंत्री सहाय्यता निधी, वसंतराव नाईक वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, शेत रस्ते इत्यादी विविध विकास कामांना 10 कोटी पेक्षा अधिक निधीचे उपलब्ध केलेला आहे. अनेक सामाजिक उपक्रमाला त्यांनी भरीव आर्थिक सहकार्य करून योगदान दिलेले आहे. त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग प्रदेश सहसंयोजक, भारतीय जनता पार्टीचा धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 
अशा या सक्षम महिलेची समाजाला गरज असल्याची जनभावना मोठ्या प्रमाणावर तयार झालेली असून जिल्हा परिषद च्या नायगाव गटातून निवडणुकीत अशा कर्तुत्ववान महिलेला उमेदवारी देण्याची मागणी समाजातील सर्व स्तरातून होताना दिसुन येते आहे.

Post a Comment

0 Comments